“मिशन मुंबई” चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न
“मिशन मुंबई” चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न
मुंबई - ॲक्शन चित्रपटाची क्रेझ साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड मध्येही असते. आता ती मराठी चित्रपटात पाहायला मिळेल. रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत “मिशन मुंबई” या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा मुंबईतील वांद्रे येथे थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला अनेक सिनेमाचे कलाकार तसेच तंत्र मंडळी हजर होती. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट वर तसेच मुंबईत आलेल्या आरडीएक्सवर आधारीत हा सिनेमा आहे. मिशन मुंबई या सिनेमात अनेक ॲक्शन दृश्य आहेत. या सिनेमात मुख्य कलाकार आनंद जोग, विजय पाटकर यांच्यासमवेत अजॉय शर्मा हे आहेत तसेच सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत विसपुते आणि कैलास पवार यांनी केले असून कथा चंद्रकांत विसपुते यांची आहे. सोशल मीडियावर मिशन मुंबई चित्रपटाच्या पोस्टरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
या चित्रपटाच्या पोस्टर अनावरण सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेता अजॉय शर्मा, ओम राणे, संकेत मोरे, प्रशांत कराड, सिद्धेश आचरेकर, शांती बावकर, अश्विनी तेंडुलकर, विपुल भोईर, राहुल कानाडोल, लक्ष्मी निवृत्ती पंधे, किरण चव्हाण, फाईट मास्टर फय्याज सय्यद तसेच दिग्दर्शक कैलाश पवार आणि चंद्रकांत विसपुते, दिग्दर्शक शिरीष राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
“मिशन मुंबई” चित्रपटात प्रमुख भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अजय शर्मा असून विजय पाटकर, आनंद जोग, सुरेखा कुडची हे कलाकार प्रमुख भूमिकेत असतील, शिवाय ओम राणे, संकेत मोरे, प्रशांत, सिद्धेश आचरेकर शांती बावकर, अश्विनी तेंडुलकर, विपुल भोईर, राहुल कानाडोल, लक्ष्मी निवृत्ती पंधे, किरण चव्हाण हे कलाकार देखील या चित्रपटात असणार आहेत. रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत ‘मिशन मुंबई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार आणि चंद्रकांत विसपुते यांनी केले आहे. चित्रपटाची कथा चंद्रकांत विसपुते यांची असून पटकथा व संवाद मच्छिंद्र कदम यांचे आहेत. छायाचित्रण नंदलाल चौधरी यांचे असून मेकअप किशोरजी पिंगळे हे करत आहेत. संगीताची धुरा समीर खोले सांभाळत असून फाइट मास्तर फय्याज सय्यद हे फाइटिंग एक्शनचा भाग करत आहेत. मिशन मुंबई चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर