‘क्रांतिज्योती विद्यालय’ येणार OTT वर
‘क्रांतिज्योती विद्यालय’ येणार OTT वर
मुंबई - नव वर्षांच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीस येऊन थिएटर गाजवल्यानंतर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्याची सज्ज झाला सिनेमानं थिएटरमध्ये जवळपास 25 कोटींची कमाई केल्यानंतर मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारीला या चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर ZEE5 वर होणार आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला की, “हा चित्रपट मराठी माध्यम शाळांचा आणि त्यांच्याशी जोडलेल्या भावनिक विश्वाचा उत्सव आहे. अभिमान, आपलेपणा आणि आपला भाषिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्व या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. चित्रपटगृहांत प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम भारावून टाकणारे होते. आता मराठी ZEE5च्या माध्यमातून असंख्य घरांपर्यंत आणि मनांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे.”
मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याचा आनंद, जिद्द, शाश्वतता आणि सांस्कृतिक अभिमान यांचा गौरव या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. समकालीन आव्हानांना सामोरे जाताना आपली मुळे आणि ओळख जपणाऱ्या एका मराठी शाळेचा आणि या शाळेशी संबंधित माणसांचा भावनिक प्रवास या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
सचिन खेडेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि कादंबरी कदम असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. सशक्त कथानक, प्रभावी अभिनय आणि मराठी माध्यम शिक्षणसंस्थांना दिलेली भावनिक मानवंदना यामुळे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade