बुध्दिबळ स्पर्धेसाठी ३४५ खेळाडूंचा सहभाग
बुध्दिबळ स्पर्धेसाठी ३४५ खेळाडूंचा सहभाग
मुंबई – बुध्दिबळ खेळाविषयी लोकांमध्ये आवड निर्माण व्हावी, शाळा, महाविद्यालयातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करावे, हा उद्देश समोर ठेऊन ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील तसेच रुद्र विद्या निकेतन व द स्कूल ऑफ चेस मास्टर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भांडुप पश्चिम येथील आयडीयूबीएस या शाळेत झालेल्या स्पर्धेत ३४५ हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता.
दरवर्षी प्रमाणे यंदाही बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन भांडुप येथील आयडीयूबीएस शाळेत करण्यात आले होते. या स्पर्धेत ठाणे, पालघर, रायगड, मुंबई जिल्ह्यातील १३० हून अधिक शाळेतील ३४५ खेळाडूंनी भाग घेतला होता. ७,८,१०,१२, व १४ वयोगटातील खेळाडू या स्पर्धेसाठी आले होते. बुध्दिबळ खेळाविषयी लोकांमध्ये आवड निर्माण व्हावी, या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव मोठे करावे, हा उद्देश समोर ठेऊन खासदार संजय दिना पाटील तसेच रुद्र विद्या निकेतनचे संस्थापक मनोज बागवे, व द स्कूल ऑफ चेस मास्टर्सचे संस्थापक विक्रांत चेलेकर यांच्या संयुक्त विद्यमाने या बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या संस्थामार्फत सध्या १२ शाळांमध्ये बुध्दिबळाचे वर्ग घेण्यात येत असून पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यासाठी खा. संजय दिना पाटील यांच्याकडून सर्व प्रकारची मदत दिली जात असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा आयोजीत केल्या जातात. या ठिकाणी बुध्दिबळ शिकणा-या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर FIDE रेटिंग मिळालेले आहे. देशातील प्रत्येक मुलाने
संज्ञानात्मक विकास, निर्णय घेण्याची कौशल्ये आणि मेंदूच्या सर्वांगीण विकासाठी बुध्दिबळ शिकणे महत्त्वाचे असल्याचे खा. संजय दिना पाटील यांनी सांगितले. या स्पर्धेत विजयी झालेले खेळाडू अरिहा देवरुखकर, यश गनिगा, मानक स्वरुप व धैर्य जैन व इतर खेळाडूंना खा. संजय दिना पाटील व भांडुप पश्चिम येथील प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant