बास डे लीडेची अष्टपैलू चमक; नेदरलँड्सचा नामिबियावर दमदार विजय
बास डे लीडेची अष्टपैलू चमक; नेदरलँड्सचा नामिबियावर दमदार विजय
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील दहाव्या सामन्यात नेदरलँड्सने नामिबियावर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. बास डे लीडेच्या अष्टपैलू कामगिरीमुळे हा सामना पूर्णतः नेदरलँड्सच्या बाजूने झुकला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या नेदरलँड्सच्या भेदक माऱ्यासमोर नामिबियाचा डाव २० षटकांत ८ गडी गमावून १५६ धावांवर आटोपला. जॅन निकोल लॉफ्टी ईटनने ४२ धावांची संयमी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, तर जॅन फ्रायलिंकने ३० आणि जोनाथन स्मिटने २२ धावा केल्या. नेदरलँड्सकडून बास डे लीडे आणि लॉगन व्हॅन बीक यांनी प्रत्येकी २ बळी घेत प्रभावी गोलंदाजी केली.
१५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सने १८ षटकांत ३ गडी गमावून १५९ धावा करत सामना सहज जिंकला. बास डे लीडेने ४८ चेंडूंत ७२ धावांची तुफानी खेळी साकारत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. कॉलिन अॅकरमनने ३२ धावा जोडल्या, तर कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाबाद १८ धावा करत संघाला विजयरेषा पार करून दिली.
या विजयासह नेदरलँड्सने गट ‘अ’ मधील आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. सामन्यातील अष्टपैलू कामगिरीसाठी बास डे लीडेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. हा विजय नेदरलँड्ससाठी पुढील लढतींसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant