सेफर्ट–अॅलनची तुफानी सलामी, न्यूझीलंडचा यूएईवर दणदणीत विजय
सेफर्ट–अॅलनची तुफानी सलामी, न्यूझीलंडचा यूएईवर दणदणीत विजय
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील अकराव्या सामन्यात गट ड मध्ये न्यूझीलंडने संयुक्त अरब अमिरातीचा दहा गडी राखून पराभव केला. एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टिम सेफर्ट आणि फिन अॅलन यांनी तुफानी फलंदाजी करत विजय सहज साकारला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या यूएईने २० षटकांत ६ गडी गमावून १७३ धावा केल्या. कर्णधार वसीम मोहम्मदने नाबाद ६६ धावांची संयमी खेळी केली. अलीशान शरफूने ५५ धावा जोडल्या. मयंक राजेश कुमारने २१ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने २, तर जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सॅन्टनर आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने अवघ्या १५.२ षटकांत बिनबाद १७५ धावा करत लक्ष्य पार केले. टिम सेफर्टने ४२ चेंडूंत नाबाद ८९ धावांची झंझावाती खेळी केली. त्याने १२ चौकार आणि ३ षटकार लगावले. फिन अॅलनने ५० चेंडूंत नाबाद ८४ धावा केल्या. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. दोघांनी सलामीला १७५ धावांची अभेद्य भागीदारी रचत सामना एकतर्फी केला.
या विजयासह न्यूझीलंडने गट ड मधील आपले स्थान भक्कम केले. नेट रनरेटमध्येही मोठी सुधारणा झाली. टिम सेफर्टच्या झंझावाती खेळासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हा विजय न्यूझीलंडच्या विश्वचषक मोहिमेसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर