Breaking News
‘साहित्य रंग’ भाग – १७, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…
मुंबई -मिती ग्रुप प्रस्तुत आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष पुढाकारातून साहित्य, कविता आणि विचारांची मेजवानी देणारे ‘साहित्य रंग’ या डिजीटल व्यासपीठाचा १७ वा भाग ०१ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम मिती ग्रुप डीजिटलच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित होणार आहे.
साहित्यप्रेमींसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. या भागात लेखक आशुतोष जावडेकर व कवयित्री पूजा भडांगे आपले साहित्यिक विचार, कविता आणि रचना सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने या करणार असून, नेहमीप्रमाणे रसिकांशी संवाद साधणारी ही मालिका साहित्यप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
‘साहित्य रंग’ ही मालिका डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या साहित्यिक जाणिवेचा आणि नव्या लेखक-कवींसाठी उभारलेल्या व्यासपीठाचा उत्तम नमुना आहे. रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम खालील लिंकवर पाहता येईल –
लिंक :
https://www.youtube.com/@mitigroupdigital8928
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade