NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

दक्षिण आफ्रिकेने जिंकले जागतिक कसोटी (WTC) अजिंक्यपद

दक्षिण आफ्रिकेने जिंकले जागतिक कसोटी (WTC) अजिंक्यपद

इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज World Test Championshipचा अंतिम सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 5 विकेटने विजय मिळवून पहिल्यांदा ICC World Test Championship जिंकली आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेने त्यांचा 27 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ सुद्धा संपवला आहे. मागील 27 वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिकेला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नव्हतं, मात्र अखेर आज त्यांना हे यश मिळालं आहे.

ऑस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार म्हटले जात होते, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी त्याला गुडघ्यावर आणलं. टॉस जिंकल्यानंतर कर्णधार बवूमा याने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली. पहिल्या डावात त्यांनी ऑस्ट्रेलियाला 212 धावांवर रोखलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 138 धावांवर ऑल आउट केले. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला 207 धावांवर रोखलं ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 282 धावांचं आव्हान मिळालं.

विजयासाठी मिळालेलं आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेच्या एडन मारक्रमने शतक ठोकलं. तर कर्णधार बवूमाने देखी नाबाद अर्धशतकीय कामगिरी केली. दोघांनी नाबाद राहून तिसऱ्या दिवशीचा खेळ 213 धावांवर संपवला, आता चौथ्या दिवशी विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला केवळ 69 धावांची आवश्यकता होती. चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी संयमी फलंदाजी करून विजयाचं आव्हान पूर्ण केलं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट