कामा व आल्बेस रुग्णालयात परिचारिका दिन जल्लोषात साजरा
कामा व आल्बेस रुग्णालयात परिचारिका दिन जल्लोषात साजरा
मुंबई - परिचारिका व्यवसायाच्या आद्य जनक फ्लोरेस नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त निमित्त 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
संपूर्ण जगाभरामध्ये या सप्ताहामध्ये रुग्णालयातील परिचारिकांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या परिचारिका दिनाचे औचित्य साधून
नुकतेच कामा अँड अल्बलेस रुग्णालयामधील परिचारिकांकडून या सप्ताहाचा शुभारंभ फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यावर्षीच्या “Our Nurses, Our Future; Caring for Nurses Strengthens Economies.”.
म्हणजेच (“आपल्या परिचारिका, आपले भविष्य; परिचारिकांची काळजी घेणे अर्थव्यवस्थेला बळकटी देते.”) या थीमचे उद्घाटन करून मार्गदर्शन करण्यात आले .
त्याचप्रमाणे या संपूर्ण सप्ताहामध्ये आनंद मेळावा, रांगोळी स्पर्धा, फ्लावर डेकोरेशन स्पर्धा, कथाकथन, अंताक्षरी स्पर्धा , सहभोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या सर्व कार्यक्रमांची सांगता दिनांक 12 मे फ्लोरेन्स नाईंटींगेल यांच्या जयंती निमित्त परिचर्या व्यवसायाची शपथ घेऊन आणि विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक वाटप करून होणार आहे. आम्ही नेहमी रुग्णालयात निर्णय सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रम घेत असतो यावर्षी देखील आम्ही परिचारिका दिनानिमित्त निरनिराळे कार्यक्रमाचे आयोजन केले होते यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या सहा.अधिसेविका निरुपमा डोंगरे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant