प्रख्यात अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन
प्रख्यात अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन
मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार (८७) आज पहाटे मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. आज दुपारनंतर जुहू येथील विशाल टॉवरमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले आले आहे. उद्या सकाळी जुहू येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशभक्तिपर चित्रपटांच्या माध्यमातून मनोज कुमार यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी स्थान निर्माण केले होते. मनोज कुमार यांनी ‘उपकार’, ‘पूरब-पश्चिम’, ‘क्रांती’, ‘रोटी, कपडा और मकान’ यांसह अनेक यशस्वी चित्रपट हिंदी सिनेसृष्टीला दिले. या चित्रपटांमुळेच प्रेक्षक त्यांना ‘भारत कुमार’ या नावाने ओळखू लागले.
. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. “दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमारजी यांच्या निधनाने अतिशय दु:ख झालं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या चित्रपटांमधून झळकणारी देशभक्ती त्यांची खास ओळख ठरली. ते आगामी पिढ्यांसाठी कायम प्रेरणास्थान राहतील. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत”, अशी सोशल मीडिया पोस्ट पंतप्रधान मोदींनी केली. दरम्यान, मनोज कुमार यांना नॅशनल अवॉर्ड, पद्मश्री पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade