भारताकडून ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट
भारताकडून ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट; २९ चित्रपटांमधून झाली निवड
मुंबई - किरण रावने दिग्दर्शित केलेल्या ‘लापता लेडीज’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं होतं. चित्रपट समीक्षकांपासून ते बॉलीवूडप्रेमींपर्यंत प्रत्येकाला या सिनेमाची अनोखी गोष्ट खूपच आवडली होती. त्यामुळे किरणचं खूप कौतुकही झालं. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला आहे. ९७ व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ‘ऑस्कर २०२५’ साठी भारताकडून ‘लापता लेडीज’ची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ( विदेशी ) चित्रपट श्रेणीसाठी ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला भारताकडून नामांकन मिळालं आहे.
फिल्म फेडरेशनकडून लापता लेडीजसह एकूण २९ चित्रपट पाठवण्यात आले होते. यात रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’, कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’, प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’, मल्याळम चित्रपट ‘आट्टम’, राजकुमार रावचा ‘श्रीकांत’, कान्स फेस्टिव्हलमध्ये बाजी मारणाऱ्या ‘ऑल वी इमेजिन ॲज लाइट’ यांसारख्या चित्रपटांचा या २९ चित्रपटांच्या यादीत समावेश होता. मात्र, आमिर खानच्या प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘लापता लेडीज’ने यात बाजी मारली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant