मनू भाकरच्या यशाचे नवे शिखर! ऑलिंपिक स्पर्धेत दोन पदके जिंकत रचला इतिहास
मनू भाकरच्या यशाचे नवे शिखर! ऑलिंपिक स्पर्धेत दोन पदके जिंकत रचला इतिहास
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग या भारतीय जोडीने भारताला दुसरं पदक मिळवून दिलं आहे. मनू आणि सरबज्योत यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. भारतीय नेमबाजांनी कोरियन जोडीचा पराभव केला. यापूर्वी रविवारी, मनू भाकेर महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती, तर आता ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिने महिलांच्या वैयक्तिक १० मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम फेरीत कांस्यपदक पटकावले. आज तीने सरबजोत सिंग याच्यासह मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक मिळवले.पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी एकाच ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला खेळाडूने २ पदके जिंकलेली नाहीत. याशिवाय २ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant