मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अर्पित पांडेने मंगला अडसूळ स्मृती खुली बुध्दिबळ स्पर्धा जिंकली

अर्पित पांडेने मंगला अडसूळ स्मृती खुली बुध्दिबळ स्पर्धा जिंकली   

  मुंबई - आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिनानिमित्त आयोजित  स्व. मंगला आनंदराव अडसूळ स्मृती चषक खुली जलद बुध्दिबळ स्पर्धा फिडे गुणांकित बुध्दिबळपटू अर्पित पांडेने जिंकली. सातव्या साखळी फेरीपर्यंत सर्व सामने जिंकणाऱ्या अर्पितने निर्णायक आठव्या फेरीमध्ये सावध खेळ करीत रचित गुरनानी विरूद्ध २८ व्या मिनिटाला बरोबरी साधली आणि सर्वाधिक ७.५ साखळी गुणांसह अजिंक्यपदाला गवसणी घातली. विजेत्या अर्पित पांडेला रुपये दहा हजार पुरस्कारासह विजेतेपदाचा स्व. मंगला अडसूळ स्मृती चषक देऊन माजी केंद्रीय राज्य अर्थमंत्री आनंदराव अडसूळ यांनी गौरविले. यावेळी को-ऑप. बँक एम्पलॉईज युनियनचे कार्याध्यक्ष विष्णू तांडेल व खजिनदार प्रमोद पार्टे, मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती.   

   को-ऑपरेटीव्ह बँक एम्पलॉईज युनियन-मुंबई, आरएमएमएस व मुंबई बुध्दिबळ संघटना सहकार्यीत स्पर्धेमध्ये रुपये सहा हजारसह द्वितीय पुरस्कार फिडे गुणांकित बुध्दिबळपटू रचित गुरनानीने (६.५ गुण) पटकाविला. १५ वर्षीय अरेना कॅन्डीडेट मास्टर अरविंद अय्यरने (६.५ गुण) तृतीय, फिडे मास्टर मिथिल आजगावकरने (६.५ गुण) चौथा, १८ वर्षीय फिडे मास्टर अनिरुद्ध पोतवाडने (६ गुण) पाचवा, अनिकेत बापटने (६ गुण) सहावा, वंश अग्रवालने (६ गुण) सातवा, जीत शाहने (६ गुण) आठवा, गुरुप्रसाद कुळकर्णीने (६ गुण) नववा, सोहम पवारने (६ गुण) दहावा, योहान बोरीचाने (६ गुण) अकरावा तर फिडे मास्टर वेदांत नगरकट्टेने (५,५ गुण) बारावा पुरस्कार मिळविला. स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सातारा आदी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ५१ बुध्दिबळपटूसह १०४ खेळाडूंनी चुरशीच्या लढती दिल्या.  को-ऑप. बँक  एम्पलॉईज युनियन-मुंबईतर्फे एकूण रु. ४१,००० /- आणि आकर्षक ७५ चषकांचा पुरस्कार शालेय व खुल्या स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांना देण्यात आला. 


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट