अनंत-राधिकाच्या लग्नात अख्खं बॉलिवूड अवतरलं
अनंत-राधिकाच्या लग्नात अख्खं बॉलिवूड अवतरलं; सलमान, शाहरुख, प्रियंका, आलिया ते अनन्याची फुल ऑन मस्ती
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट आज लग्नबंधनात अडकणार आहेत. बीकेसीमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा लग्नसोहळा पार पडत आहे. अनंत-राधिकाच्या लग्नसोहळा सुरू झाला आहे. कुटुंबातील नवीन सदस्याचे स्वागत करण्यासाठी अंबानी निवासस्थान नवरीप्रमाणे सजवण्यात आलं आहे. अँटिलियामधून वाजत गाजत वरात घेऊन अनंत बीकेसीमध्ये पोहोचला. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वरात पोहोचताच कलाकारांनी ढोल-ताशाच्या तालावर नाचायला सुरुवात केली.
अनंत-राधिकाच्या लग्नात अख्खं बॉलिवूड अवतरलं
अनंत आणि राधिकाचा विवाह पारंपारिक वैदिक हिंदू रितीरिवाजांनुसार होणार आहे. अनंत आणि राधिका दोघेही गुजराती कुटुंबातील आहेत, त्यामुळे त्यांच्या लग्न गुजराती विधी होतील. एकीकडे लग्नातील विधी सुरु असून दुसरीकडे पाहुण्यांचं आगमन सुरू आहे. अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाला देशातील दिग्गज नेते, कलाकार, खेळाडू यासह अनेक परदेशी पाहुणे येणार आहेत. लग्नासाठी अनेक प्रसिद्ध लोक पोहोचले आहेत. पापाराझींनी सर्व सेलिब्रिटी पोझ देताना दिसत आहेत. तर सेलिब्रिटी मंडळी लग्नात डान्स करत फुल ऑन मजा घेताना दिसत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade