मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

धर्मवीर -२ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

धर्मवीर -२ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

ट्रेण्डिंग     

मुंबई, -: ठाणे येथील शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर ९ ऑगस्ट रोजी धर्मवीर-२ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच होती. नुकताच धर्मवीर-२चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून हा चित्रपट हिंदी भाषेमध्येसुद्धा प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर -२ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्टस् या प्रोडक्शन कंपनीचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिलं असून चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे.

टीजरमध्ये एक मुस्लिम महिला राखी बांधायला दिघे साहेबांकडे येते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं आणि साहेब संतापतात. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन साहेब निघतात… त्याचवेळी खास शैलीत साहेब म्हणतात, ‘ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी, त्याची बरबादी नक्की!’ अंगावर काटा आणणाऱ्या या टीजरमधून साहेबांच्या हिंदुत्त्वाची एक झलक पाहायला मिळते. त्यामुळे आता चित्रपटाविषयी तीव्र उत्सुकता निर्माण होत आहे.

धर्मवीर -२ या चित्रपटात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. त्याने या चित्रपटाचा ट्रेलर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत ‘ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की….धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमाचा टिझर!! धर्मवीर – २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’असं कॅप्शन दिलं आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट