मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

‘आय.टी.त मराठी, ऐटीत मराठी’ कार्यशाळा

पनवेल ः मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून एमकेसीएलतर्फे पत्रकारांसाठी ‘आयटीत मराठी- ऐटीत मराठी’  विनामूल्य कार्यशाळा नवीन पनवेल येथील शाहू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पार पडली. शाहू इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक व एमकेसीलचे कोकण प्रमुख जयंत भगत यांच्या संकल्पनेतून हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचा पनवेल व नवी मुंबईतील 30 हुन अधिक पत्रकारांनी लाभ घेतला. 

या कार्यशाळेत टंकलेखनापेक्षा मोबाईलवर मराठीत बोलून संदेश लिहिणे, मराठीतून इतर कोणत्याही भाषेत व अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करणे, जुन्या मराठी पानांच्या फोटो वरून त्याचे टेक्स्ट मिळविणे, मराठीतून टाईप करणे, ऑनलाईन अर्ज भरणे, मराठी वर्तमानपत्र ऑनलाईन वाचणे, सोशल मिडियावर मराठी वापरणे असे उपयुक्त अनेक प्रात्यक्षिके तज्ज्ञांच्या मार्फत सादर करण्यात आली .  

ज्ञानाची देवाण-घेवाण माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेतून व्हावी, तसेच इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपयंत मराठी भाषेतून उपलब्ध व्हावे, या करिता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित प्रयत्नशील आहे. त्यासाठी मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून चघउङतफे ‘आयटीत मराठी- ऐटीत मराठी’ ही दोन तासांची विनामूल्य कार्यशाळा 24 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2020 दरम्यान आयोजित केली आहे. जागजागतिकीकरणाच्या या जमान्यात मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी, विकासासाठी, समृद्धीसाठी, अस्मितेसाठी, आणि उन्नतीसाठी योजिलेला हा उपक्रम सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त आहे. 

टँली, डीटीपी, वेब डिजाईन, सी प्लस प्लस, ग्राफिक डिजाईन, अड्वान्स एक्सेल  मराठी भाषकांसाठी विविध उपयुक्त अ‍ॅप्स , शब्दकोश, इ. विविध आयटी सुविधा व टूल्स आपण मराठी भाषेतून वापरली तरच जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषा जगात ऐटीत राहू शकेल म्हणून जर ‘आयटीत मराठी (तरच) ऐटीत मराठी’! ही कार्यशाळा महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर सर्वदूर उपलब्ध असलेल्या 5000 हून अधिक चड-उखढ केंद्रावर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. त्याचा मराठी राजभाषादिनानिमित्त जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन जयंत भगत यांनी केले आहे. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट