दुष्काळी तालुक्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील निधीटंचाई निवारणासाठी प्राधान्य
दुष्काळी तालुक्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील निधीटंचाई निवारणासाठी प्राधान्य
मुंबई-: राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत उपलब्ध निधीचा प्राधान्याने वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. वित्त व नियोजन तसेच मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या या निर्णयासंदर्भातील शासन निर्णय नियोजन विभागाने दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित केला आहे. नकाशेपहा
राज्यातील ३०४ तालुके दुष्काळी तालुके म्हणून घोषित करण्यात आले आहेत. आगामी काळात या तालुक्यांमध्ये पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा उपलब्धतेच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, टंचाई निवारणाच्या उपाययोजनांसाठी उपलब्ध शासकीय निधीचा अधिक परिणामकारक वापर करण्याची आवश्यकता होती.
या अनुषंगाने टंचाईसंदर्भात गठित मंत्रिमंडळ उपसमितीच्या मा. अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांनुसार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी शासन निर्णयाचा मसुदा तयार करून पुढील कार्यवाहीसाठी सादर केला होता. त्यानुसार राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
उपलब्ध पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास सर्वोच्च प्राधान्य
अनेक ठिकाणी जलाशय, तलाव, विहिरी व अन्य जलस्रोतांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही जलवाहिन्या, पंप, विद्युत जोडण्या, साठवण टाक्या अथवा वितरण व्यवस्था अपूर्ण असल्याने नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही. अशा कामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून ती कमीत कमी कालावधीत पूर्ण करण्यावर या शासन निर्णयात विशेष भर देण्यात आला आहे.
नवीन जलस्रोत निर्माण करण्याबरोबरच विद्यमान जलस्रोतांचे बळकटीकरण, पाणीगळती रोखणे, नादुरुस्त यंत्रणांची दुरुस्ती आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अत्यावश्यक नसलेल्या कामांचा निधी टंचाई निवारणासाठी वळविणार
जिल्हा वार्षिक योजनेतील अत्यावश्यक नसलेल्या नवीन बांधकामांना तात्पुरती स्थगिती देऊन, त्यासाठी उपलब्ध असलेल्या अनुज्ञेय निधीचे नियमानुसार पुनर्विनियोजन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नकाशेपहा
नवीन उद्याने, सुशोभीकरण, प्रशासकीय इमारती, सिमेंट रस्ते, गटारे तसेच मोठ्या प्रमाणावर पाणी लागणाऱ्या आणि टंचाई निवारणासाठी अत्यावश्यक नसलेल्या नवीन कामांचा यासाठी आढावा घेतला जाणार आहे.
यातून उपलब्ध होणारा निधी टंचाई निवारणाच्या प्राधान्याच्या कामांसाठी वापरण्यात येणार असून, निधीचे पुनर्विनियोजन ३१ डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र, पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा, जलसंधारण, सार्वजनिक आरोग्य व सुरक्षितता यांच्याशी संबंधित अत्यावश्यक कामांना या स्थगितीतून वगळण्यात आले आहे. तसेच यापूर्वी सुरू असलेल्या कामांना सरसकट स्थगिती न देता प्रकरणनिहाय निर्णय घेतला जाणार आहे.
तातडीच्या उपाययोजनांना पालकमंत्र्यांच्या स्तरावर मान्यता
टंचाई निवारणाच्या अत्यावश्यक व तातडीच्या उपाययोजनांना मंजुरी देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची प्रतीक्षा करावी लागल्याने अंमलबजावणीस विलंब होऊ नये, यासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. नकाशेपहा
अशा अपवादात्मक परिस्थितीत जिल्हाधिकारी संबंधित कामाचा प्रस्ताव पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करू शकतील. पालकमंत्र्यांच्या मान्यतेनंतर जिल्हा नियोजन समितीच्या पुढील बैठकीत मंजुरी घेण्याच्या अधीन राहून, नियमानुसार निधी उपलब्ध करून देता येणार आहे. यामुळे अत्यावश्यक उपाययोजनांच्या मंजुरी प्रक्रियेला गती मिळणार आहे.
सात दिवसांत जिल्हास्तरीय बैठक; पंधरा दिवसांत एकात्मिक कृती आराखडा
शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून सात दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच पंधरा दिवसांच्या आत तालुकानिहाय व कामनिहाय जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करून तो मदत व पुनर्वसन विभाग आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या टंचाई कृती आराखड्यांशी एकात्मिक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रत्येक कामासाठी आवश्यक निधी, काम पूर्ण होण्याचा कालावधी, प्रत्यक्ष उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी, लाभार्थी गावे, लोकसंख्या आणि पशुधन यांचा तपशील या आराखड्यात समाविष्ट केला जाणार आहे.
चालू टंचाईच्या कालावधीत प्रत्यक्ष लाभ देणाऱ्या कामांना प्राधान्य
केवळ कामांना मंजुरी देण्याऐवजी चालू टंचाईच्या कालावधीत कामे पूर्ण होऊन त्यांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना व पशुधनाला मिळावा, यावर विशेष भर देण्यात आला आहे.
सर्वसाधारणपणे चालू आर्थिक वर्षात पूर्ण होऊ न शकणाऱ्या नवीन कामांना या विशेष प्राधान्यक्रमांतर्गत मंजुरी दिली जाणार नाही. तथापि, अपवादात्मक परिस्थितीत अत्यावश्यक कामांसाठी सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने पुढील आर्थिक वर्षातील दायित्व निर्माण करण्याची मर्यादित तरतूद करण्यात आली आहे.
निधीचा पारदर्शक वापर आणि परिणामाधारित संनियंत्रण
मंजूर कामे, वितरित निधी, प्रत्यक्ष खर्च, कामांची प्रगती आणि त्यातून उपलब्ध झालेले अतिरिक्त पाणी यांचा दरमहा आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत नियोजन व वित्त विभागास अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाणीऑर्डर करा
मंजूर कामांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अथवा उपलब्ध शासकीय संगणकीय प्रणालीवर प्रसिद्ध करण्याबरोबरच कामांच्या पूर्वस्थितीची व काम पूर्ण झाल्यानंतरची जीआयएस टॅगिंगसह छायाचित्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
एकाच कामासाठी दुबार निधी उपलब्ध होणार नाही तसेच निधीचा गैरवापर होणार नाही, यासाठीही आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत.
टंचाई निवारणाच्या दृष्टीने शासन निर्णयाचे प्रमुख फायदे :
राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांना दिलासा.
पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा यांना सर्वोच्च प्राधान्य.
जिल्हा वार्षिक योजनेतील उपलब्ध निधीचा गरजेनुसार परिणामकारक वापर.
अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठीचा निधी टंचाई निवारणाकडे वळविण्याची सुविधा.
अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्यास चालना.
अत्यावश्यक उपाययोजनांच्या मंजुरी प्रक्रियेला गती.
विविध प्रशासकीय विभागांच्या उपाययोजनांमध्ये समन्वय.
शासकीय निधीच्या वापरात अधिक पारदर्शकता व आर्थिक शिस्त.
वारंवार टंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजनांनाही चालना.
विकासकामांच्या प्राधान्यक्रमात परिस्थितीनुसार बदल करून नागरिकांच्या जीवनावश्यक गरजांना प्राधान्य शास्त्रशिका
टंचाईच्या काळात उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब आणि शासकीय निधीचा प्रत्येक रुपया अधिकाधिक परिणामकारक पद्धतीने वापरणे आवश्यक आहे. केवळ नवीन कामांना मंजुरी देण्यापेक्षा उपलब्ध जलस्रोतांमधील पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि त्यातून कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांना दिलासा देणे, ही या निर्णयामागील प्रमुख भूमिका आहे.
नियमित विकासकामांच्या प्राधान्यक्रमात परिस्थितीनुसार आवश्यक बदल करून नागरिकांच्या जीवनावश्यक गरजांना सर्वोच्च प्राधान्य देणारा हा निर्णय राज्यातील टंचाई निवारणाच्या उपाययोजना अधिक गतिमान, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी नमूद केले.
सदर शासन निर्णयातील तरतुदी सन २०२६-२७ साठी लागू असून, यापुढे नव्याने दुष्काळग्रस्त अथवा टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात येणाऱ्या तालुक्यांनाही त्या लागू राहणार आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Arjun Rampal
- जन्मदिन
- November 26
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya