लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती
लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती
ब्यूनर्स आयर्स- : दि. १ : अर्जेंटिनाच्या जर्सीत 207 सामने खेळून 125 गोल करणारा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 39 वर्षीय मेस्सीने राष्ट्रीय संघासाठी सुमारे 20 वर्षे सेवा दिल्यानंतर हा अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तब्बल 6 विश्वचषक स्पर्धा खेळणाऱ्या मेस्सीने 2022 मध्ये कतार येथे अर्जेंटिनाला जगज्जेतेपद मिळवून दिले होते. तसेच 2026 च्या विश्वचषकातही त्याने संघाचे नेतृत्व करत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती, जिथे स्पेनविरुद्ध झालेल्या पराभवानंतर त्याने संघाचा निरोप घेण्याचा विचार पक्का केला.
मेस्सीने इंस्टाग्रामवर भावनिक संदेश लिहून निवृत्तीची घोषणा केली. त्याने सांगितले की, “मी नेहमी अर्जेंटिनासाठी सर्वस्व दिले. आता माझ्याकडे देण्यासारखे काही शिल्लक नाही. नवीन पिढीला संधी मिळावी म्हणून मी बाजूला होतो आहे.” ही घोषणा त्याने वर्ल्ड कप अंतिम सामन्यानंतर दोन दिवसांनी लिहिली होती, पण वडील जॉर्ज मेस्सी यांच्या निधनामुळे ती सार्वजनिक करण्यास विलंब झाला.
मेस्सीने लिहिले आहे की , आम्ही जे स्वप्न पाहिले होते, ते देशातील जनतेला मिळवून देऊ शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. देवाने मला अर्जेंटिनाचा नागरिक म्हणून जन्म दिला याबद्दल मी ईश्वराचे आभार मानतो, असे सांगत त्याने आपल्या विधानाचा समारोप केला. गेल्या 20 वर्षांत मिळालेल्या अफाट प्रेमाबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आता मी मैदानाबाहेरून एका सामान्य चाहत्याप्रमाणे संघाला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही काळात कायम पाठिंबा देत राहीन. या सुंदर पण आव्हानात्मक प्रवासात कायम सोबत राहिलेल्या कुटुंबाचे, सर्व प्रशिक्षकांचे, सहकाऱ्यांचे आणि प्रशासकांचे त्याने मनापासून आभार मानले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant