रायगड जिल्ह्यातील म्हसळा या मध्यवर्ती ठिकाणी महानगर गॅस च्या नव्या CNG पंपाचे शुभारंभ.
रायगड जिल्ह्यातील म्हसळा या मध्यवर्ती ठिकाणी महानगर गॅस च्या नव्या CNG पंपाचे शुभारंभ.
मुंबई-म्हसळा तालुक्यासाठी आता आनंदाची बातमी
गेल्या अनेक वर्षांपासून cng पंपाच्या प्रतीक्षेत असलेल्या रायगड जिल्ह्यातील म्हसळा या मध्यवर्ती तालुक्याच्या ठिकाणी दिनांक १२ ऑगस्ट रोजी महानगर गॅसच्या नव्या CNG पंपाचे थाटात शुभारंभ करण्यात आले आहे.
म्हसळा येथील बायपास नजीक असलेल्या श्री. कादीरी यांच्या भारत पेट्रोलियम या पंपामध्ये महानगर गॅस cng पंप सर्व सुविधांसह सुरू करण्यात आला आहे..
त्यामुळे म्हसळा आणि परिसरातील वाहनचालकांना तसेच मुंबई पुणे वरून येणाऱ्या पर्यटकांना आता प्रदूषणमुक्त इंधन स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. शहरातील वाढत्या इंधन मागणीमुळे तसेच पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने हा पंप सुरू करण्यात आला आहे.
यामुळे आता स्थानिक रोजगारालाही चालना मिळणार आहेत ..
स्थानिक रिक्षा चालक , टूर्स आणि ट्रॅव्हल्स चालक ,प्रवाशी पर्यटक यांना म्हसळा या मध्यवर्ती ठिकाणी ही सेवा मिळणार आहे. आज ८६.०० रुपये प्रति kg दराने विक्री सुरू असल्याची माहिती कर्मचारी वर्गाने दिली आहे..
म्हसळा पासून ३० ते ४० कीलोमीटर परिसरात cng सेवा उपलब्ध नसल्याने स्थानिक वाहन चालक , रिक्षा चालक,इत्यादी प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणावर गैर सोय होत असे..
या cng पंपामुळे आता वाहन चालकांना नक्कीच दिलासा मिळेल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराला चालना मिळतील याचा मला नक्कीच आनंद आहे. अश्या भावना उद्घाटन प्रसंगी पंपाचे मालक श्री. कादीरी यांनी व्यक्त केल्या.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade