काळाचौकी येथे वह्या वाटप कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद
काळाचौकी येथे वह्या वाटप कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद
मुंबई प्रतिनिधी -शिवसेना प्रणीत राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन च्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि सुलेखन दिना निमित्त नुकतेच एस.एस.एम. शिवाजी विद्यालय,अभ्युदयनगर काळाचौकी येथे ‘प्रोजेक्ट विद्या’ हा गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्या गरजू विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हा उपक्रम शिक्षणाला पाठबळ देण्यावर आणि तरुण विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने त्यांची शिकण्याची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर केंद्रित होता शिक्षण,आरोग्य आणि समाजकल्याणा साठी शिवसेना प्रणीत राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन नेहमीच अग्रेसर राहील असा विश्वास प्रमुख पाहुणे शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख,विधानसभेचे संघटन प्रमुखदगडू (दादा) सकपाळ यांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिवस्वराज सेनेचे व लायन्स क्लब ऑफ सॅफ्रन चे अध्यक्ष लायन जितेंद्र सकपाळ,क्लबचे सचिव लायन संजू ससमल, खजिनदार लायन ज्योती राणे यांच्या नेतृत्वाखाली व लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉनच्या पदाधिकाऱ्यांनी केले. त्याप्रसंगी फर्स्ट व्हॉइस डिस्टिक गव्हर्नर लायन होझेफा घाडियाली, फास्ट डिस्टिक गव्हर्नर लायन संतोष चौहाण,शिवाजी क्षणोत्तेजक मंडळचे संचालक अधिराज लोकेगावकर, शिवसेना शिवडी विधानसभा विभाग प्रमुख शशिकांत निकम, महिला विभाग प्रमुख सौ.रेश्मा सकपाळ गावकर शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थी,शिक्षकवृंद उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade