विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास देण्यास पूर्ण बंदी – या जिल्हा परिषदेचा निर्णय
विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास देण्यास पूर्ण बंदी – या जिल्हा परिषदेचा निर्णय
मुंबई-: कोरोना कालावधीमध्ये शिक्षण थांबू नये म्हणून शालेय मुलांना मोबाईलवरून अभ्यास दिला जात असे, तसेच Online वर्गही चालवले जात असत. यामुळे मुलांना फायदा झाला असला तरीही त्यांना अधिक काळ मोबाईल वापरण्याची सवय झाली हे ही तितकेच खरे आहे. मुलांची मोबाईलची सवय सोडवण्यासाठी उपाय म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेने उत्तम निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये वाढणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्या रोखणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
आहे. यापुढे शिक्षकांनी अभ्यास देण्यासाठी पूर्वीचीच पारंपारिक पद्धत अवलंबावी, असा आदेश सर्व शाळांना दिला जाणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांचे पाढे पाठांतर करून घेण्याची जुनी पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार असून, त्याची तपासणी आता थेट जिल्हा परिषद शिक्षण प्रशासनाकडून केली जाईल.
विद्यार्थ्यांना २ ते ३० पर्यंतचे पाढे तोंडपाठ करून घेण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. आता पाढे पाठांतराबाबत स्वतः जिल्हा शिक्षणाधिकारी शाळांना अचानक भेटी देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि याची प्रत्यक्ष पाहणी करतील. शिक्षणप्रेमी आणि पालक वर्गाने जिल्हा परिषदेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर