गौतम अदानींवरील सर्व गुन्हेगारी आरोप अमेरिकेकडून रद्द
गौतम अदानींवरील सर्व गुन्हेगारी आरोप अमेरिकेकडून रद्द
वॉशिग्टन डीसी-: अमेरिकेतील न्यू यॉर्क जिल्हा न्यायालयाने उद्योगपती गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी आणि सहकारी विनीत जैन यांच्यावरील सर्व गुन्हेगारी व रोखे फसवणुकीचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. न्यायाधीश निकोलस गरोफिस यांनी अमेरिकन सरकारच्या विनंतीवरून हा निर्णय दिला असून, हे प्रकरण कायमचे बंद करण्यात आले आहे.
आरोपांची पार्श्वभूमी
लाचखोरीचा आरोप: नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने दावा केला होता की भारतातील सौर ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी अदानी समूहाने 265 दशलक्ष डॉलरची लाच दिली.
गुंतवणूकदारांची फसवणूक: आंतरराष्ट्रीय व अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल केली आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होता.
अधिकारक्षेत्राचा मुद्दा: हा विषय भारताच्या अधिकारक्षेत्रातील असल्याने अमेरिकन तपास यंत्रणांचा वेळ व साधनसंपत्ती वाया जात असल्याचा युक्तिवाद न्याय विभागाने केला.
तडजोड करार
गुन्हेगारी खटला रद्द होण्यासोबतच, अदानी समूहाने अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनसोबत 18 दशलक्ष डॉलरचा करार केला आहे.
या करारात अदानी समूहाने कोणताही गुन्हा मान्य केलेला नाही.
नागरी खटला अधिकृतपणे मिटवण्यात आला आहे.
अदानी समूहाने अमेरिकेत 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. यामुळे केस मागे घेण्याशी गुंतवणुकीचा संबंध असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र न्यायालयाने स्पष्ट केले की या गुंतवणुकीचा आणि केस मागे घेण्याचा काहीही संबंध नाही.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर