बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देणीबाबत सकारात्मक भूमिका.
बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देणीबाबत सकारात्मक भूमिका.
मुंबई-बेस्ट उपक्रमातील सुमारे ४,५०० सेवानिवृत्त अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित निवृत्तीविषयक देणी या महत्त्वाच्या विषयावर आज दुपारी २.०० वाजता बेस्ट समितीच्या अध्यक्षा श्रीमती तृष्णा विश्वासराव यांच्या दालनात बैठक संपन्न झाली.
बैठकीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी, त्यावरील व्याज तसेच इतर प्रलंबित देणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्षा महोदयांनी सांगितले की, सुमारे १५० ते २०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी तसेच त्यावरील व्याज अदा करण्यात आले आहे. उर्वरित पात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी सप्टेंबर अखेरपर्यंत देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यानंतर व्याजाची रक्कमही अदा करण्यात येईल.
तसेच, दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्यात सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी बेस्ट प्रशासनामार्फत अदा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे स्पष्ट आश्वासन अध्यक्षा महोदयांनी दिले.
बैठकीदरम्यान त्यांनी “सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची देणी मिळालीच पाहिजेत,” अशी ठाम व सकारात्मक भूमिका मांडली. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे उपस्थित प्रतिनिधींनी स्वागत करत त्यांचे अभिनंदन व मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या बैठकीस इंजि. रमेश भुतेकर देशमुख, कार्याध्यक्ष, म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन, इंजि. मुकुंदराव निकम, अध्यक्ष, बेस्ट इंजिनिअर्स असोसिएशन, इंजि. दिलीप सूर्यवंशी तसेच बेस्ट प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या हक्काच्या देणीबाबत बेस्ट समिती अध्यक्षा श्रीमती तृष्णा विश्वासराव यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका दिलासादायक असून, दिलेल्या आश्वासनांची वेळेत अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant