*परळ येथे सहकार मेळावा व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
*परळ येथे सहकार मेळावा व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न*
मुंबई : मुंबई शहर बेरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशन मर्यादित यांच्या वतीने शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. शिरोडकर सभागृह, परळ, मुंबई येथे सहकार मेळावा, सत्कार व सन्मान सोहळा उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर, पदाधिकारी, संचालक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रसाद लाड होते. मार्गदर्शक आणि सत्कारमूर्ती म्हणून आमदार प्रविण दरेकर तसेच शिवाजीराव नलावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी संघटितपणे कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सहकाराच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, समाजहित आणि परस्पर सहकार्य या विषयांवरही त्यांनी विचार मांडले.
कार्यक्रमाला सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर, जिजाबा पवार, संतोष बोबडे,नितीन बनकर, अनिल गजरे, विनोद बोरसे, जयश्री ताई पांचाळ, विजय शेलार, यशवंत भाई सावंत, अनिषा ताई माजगावकर यांच्यासह मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध सहकारी संस्था आणि बेरोजगार संघटनांचे अनेक पदाधिकारी व संचालक उपस्थित होते
या मेळाव्याचे आयोजन बाळासाहेब घाडगे, अध्यक्ष, मुंबई शहर बेरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशन मर्यादित यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समितीने विशेष परिश्रम घेतले. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध बेरोजगार सेवा संस्थाचा व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात सहकार क्षेत्राचा विकास, रोजगारनिर्मिती आणि संस्थात्मक बळकटी या विषयांवर चर्चा करण्यात आली. बेरोजगार सेवा व सेवा सहकारी संस्थांनी रोजगारनिर्मिती क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. सहकाराच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता मान्यवरांच्या सत्कारानंतर आणि उपस्थितांच्या संवादाने झाली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant