EPFO च्या नियमात बदल, खासगीक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना होणार फायदा
EPFO च्या नियमात बदल, खासगीक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना होणार फायदा
मुंबई-: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) PF आणि पेन्शनसाठीची मूळ वेतन मर्यादा १५,००० वरून २५,००० करण्याचा प्रस्ताव तयार केला असून अर्थ मंत्रालयाने त्याला मंजुरी दिली आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर हा नियम १ एप्रिल २०२७ पासून लागू होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने खाजगी नोकरदारांच्या भविष्याच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) वेतन मर्यादेत तब्बल १० वर्षांनंतर वाढ करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. अर्थ मंत्रालयाने मूळ वेतनाची (Basic Salary) सध्याची १५,००० ची मर्यादा वाढवून २५,००० करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे.
हा नियम प्रामुख्याने संघटित खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. ज्या कंपन्यांमध्ये २० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा सर्व संस्थांना हा नियम लागू होतो. ज्यांचे मूळ वेतन १५,००० ते २५,००० रुपयांच्या दरम्यान आहे, असे कर्मचारी आतापर्यंत पीएफ आणि पेन्शन योजनेच्या कक्षेबाहेर होते. आता या नव्या निर्णयामुळे त्यांना निवृत्तीनंतर नियमित पेन्शन आणि पीएफचा मोठा निधी जमा करण्याची संधी मिळेल.
EPFO च्या नियमांनुसार सध्या ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन १५,००० रुपयांपर्यंत आहे, त्यांच्यासाठीच PF कपात अनिवार्य आहे. ही मर्यादा शेवटची सप्टेंबर २०१४ मध्ये सुधारित करण्यात आली होती, जेव्हा ती ६,५०० रुपयांवरून १५,००० रुपये करण्यात आली होती.आता तब्बल १० वर्षांनंतर ही मर्यादा २५,००० रुपये केली जाणार आहे. सुरुवातीला ही मर्यादा ३०,००० रुपयांपर्यंत नेण्याचा विचार होता, मात्र अखेर २५,००० रुपयांच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant