सहकार मेळाव्यात सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव; सहकार चळवळ अधिक बळकट करण्याचा निर्धार
सहकार मेळाव्यात सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव; सहकार चळवळ अधिक बळकट करण्याचा निर्धार
मुंबई, दि. १ ऑगस्ट : मुंबई शहर बेरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशन मर्यादित यांच्या वतीने परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित 'सहकार मेळावा, सत्कार व सन्मान सोहळा' उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडला. सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, संचालक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री. प्रसाद लाड हे होते. मार्गदर्शक व सत्कारमूर्ती म्हणून आमदार श्री. प्रविण दरेकर तसेच मा. श्री. शिवाजीराव नलावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी संघटितपणे कार्य करण्याची गरज असल्याचे यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.
कार्यक्रमाला मा. श्री. सिद्धार्थ कांबळे, मा. श्री. नंदकुमार काटकर, मा. श्री. जिजाबा पवार, मा. श्री. संतोष बोंद्रे यांच्यासह मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध सहकारी संस्था आणि बेरोजगार संघटनांचे अनेक पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.
या मेळाव्याचे आयोजन श्री. बाळासाहेब घाडगे (अध्यक्ष, मुंबई शहर बेरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशन मर्यादित) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समितीने विशेष परिश्रम घेतले.
सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सहकार चळवळीला नवी दिशा देणारा आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ करणारा हा मेळावा ठरला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant