माजी सिव्हिल सर्जनने चालवले गर्भपाताचे मोठे रॅकेट , पोलिसांनी रंगेहात पकडले
माजी सिव्हिल सर्जनने चालवले गर्भपाताचे मोठे रॅकेट , पोलिसांनी रंगेहात पकडले
कोल्हापूर -: राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कोल्हापुर जिल्ह्यात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरात एका माजी सिव्हिल सर्जननेच बेकायदेशीर गर्भपाताचे मोठे रॅकेट चालवल्याचे समोर आले आहे. करवीर पोलिसांनी धडक कारवाई करत कदमवाडी परिसरातील ‘प्रतिमा हॉस्पिटल’वर धाड टाकून माजी सिव्हिल सर्जन डॉ. चंद्रकांत गायकवाड यांना रंगेहात पकडले आहे. प्राथमिक चौकशीत या डॉक्टराने तब्बल ३०० हून अधिक अवैध गर्भपात केल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करवीर पोलिसांनी कदमवाडी येथील ‘प्रतिमा हॉस्पिटल’ परिसरात सापळा रचला. हे रुग्णालय बेकायदेशीर गर्भपाताचे मुख्य केंद्र बनले होते. पोलीस पथकाने अचानक धाड टाकली असता प्रत्यक्ष बेकायदेशीर गर्भपाताची प्रक्रिया सुरू असतानाच डॉ. चंद्रकांत गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
उच्च पदस्थ राहिलेल्या एका जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यानेच अशा प्रकारे कायद्याची पायमल्ली करत अवैध गर्भपाताचे केंद्र चालवल्याचे समोर आल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.
संशयित आरोपी डॉ. गायकवाड हे आरोग्य क्षेत्रातील नामांकित आणि उच्चपदस्थ अधिकारी राहिलेले आहेत. त्यांनी रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे ‘सिव्हिल सर्जन’ म्हणून सेवा बजावली आहे. याशिवाय मुंबईतील प्रसिद्ध सेंट जॉर्ज रुग्णालयात सहाय्यक अधीक्षक आणि आरोग्य उपसंचालक यांसारख्या अत्यंत जबाबदार पदांवरून ते निवृत्त झाले आहेत.
डॉ. गायकवाड यांनी आतापर्यंत सुमारे ३०० हून अधिक महिलांचे बेकायदेशीर गर्भपात केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कारवाईमुळे या रॅकेटमध्ये आणखी कोणकोणते एजंट, मध्यस्थ किंवा इतर वैद्यकीय कर्मचारी सहभागी आहेत का, याचा सखोल तपास करवीर पोलीस करत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade