एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ
मुंबई-: ST च्या प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी 1 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. पात्र प्रवाशांनी या वाढीव मुदतीचा उपयोग करून NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत देण्यात येते. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यभरातील सर्वच बस डेपो आणि शहरात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी प्रवाशी, सवलतीमधील प्रवाशांची आणि नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी नागरिकांना हे कार्ड जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रार देखील समोर येत आहेत. त्यामुळे, प्रवासी, नागरिकांची हेळसांड होऊ नये म्हणून आता ही मुदत आणखी एक महिना वाढवण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade