मस्क यांनी लॉन्च केले X मनी फीचर
मस्क यांनी लॉन्च केले X मनी फीचर
मुंबई-: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने आता दैनंदिन बँकिंग ॲक्टिव्हिटीजच्या सुविधेसाठी एलन मस्क यांनी X मनी फीचर लाँच केले आहे. कंपनीने सध्या फक्त अमेरिकेत आपल्या प्रीमियम आणि प्रीमियम+ सबस्क्रायबर्ससाठी या बँकिंग सेवा सुरू केल्या आहेत. X मनी फीचरद्वारे सबस्क्रायबर्सना ॲप न सोडता त्यांच्या दैनंदिन बँकिंग ॲक्टिव्हिटीज करण्याची सुविधा मिळेल. या सेवेअंतर्गत यूजर्सना क्रॉस रिवर बँकेच्या मदतीने डिपॉझिट अकाउंट मिळेल.
याच्या मदतीने यूजर्स पैसे प्राप्त करू शकतील, इतर X यूजर्सना पैसे ट्रान्सफर करू शकतील, बिलांचे पेमेंट करू शकतील, वायर ट्रान्सफर पाठवू शकतील आणि फिजिकल चेक देखील जमा करू शकतील. X मनी अंतर्गत एक व्हर्च्युअल व्हिसा डेबिट कार्ड आपोआप जारी होईल. हे कार्ड Apple Pay आणि Google Pay या दोन्हीसोबत काम करते. सध्या, X मनीची सुविधा केवळ अमेरिकेतील प्रीमियम आणि प्रीमियम+ सबस्क्रायबर्ससाठीच उपलब्ध आहे. पात्र वापरकर्ते थेट डिपॉझिट सेट करून 6% पर्यंत वार्षिक टक्केवारी उत्पन्न (APY) मिळवू शकतात.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant