या सरकारी बँकेचा 1 TB डेटा लिक
या सरकारी बँकेचा 1 TB डेटा लिक
मुंबई-: देशातील सहाव्या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदा (BoB) बँकेचा तब्बल 1 TB डेडा लिक झाला आहे. एका हॅकरने बँकेच्या सिस्टीममध्ये घुसखोरी करून लाखो ग्राहकांचा अत्यंत संवेदनशील डेटा लीक केल्याचा दावा केला आहे. हॅकरने 1 टीबी संवेदनशील डेटा चोरुन तो डार्क वेबवर विनामूल्य अपलोड केल्याचा दावा करण्यात आला आहे. या डेटामध्ये भारतातील विविध शाखांमधील ग्रहाकांचे आधार क्रमांक, नावे आणि कर्जाच्या तपशिलासारखी वैयक्तिक तसेच कॉर्पोरेट बँकिंग माहितीचा समावेश आहे. मात्र बँक ऑफ बडोदा, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) किंवा कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) कडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. डेटा खरा असेल, तर ग्राहकांना फिशिंग हल्ले, ओळख चोरी आणि आर्थिक फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो.
मात्र बँक, CERT-In किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून याला दुजोरा मिळालेला नाही. हॅकरने 1 टीबी संवेदनशील डेटा चोरल्याचा दावा केला आहे. यामध्ये बचत आणि चालू खात्याची माहिती, कर्जाची माहिती, नेटबँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची माहिती, एनआरआय आणि कॉर्पोरेट बँकिंग सेवांची माहिती, ग्राहक सहाय्यता माहिती आणि शाखा किंवा एटीएमच्या नोंदी यांचा समावेश आहे. 25 जुलै रोजी ‘ransomeware.live’ या डार्क वेब ट्रॅकिंग साइटद्वारे या डेटा लीकची माहिती मिळाली.
ग्राहकांसाठी महत्वाची सूचना
इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग लॉगिन आयडी आणि पासवर्ड तात्काळ बदलावा.
हॅकर्सनी आधार क्रमांक लीक केल्याचा दावा करण्यात आला आहे यामुळे, UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला किंवा mAadhaar ॲपला भेट देऊन बायोमेट्रिक्स लॉक केल्यास आधारचा गैरवापर टाळता येईल. बँकेचा कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही संशयास्पद कॉल, एसएमएस किंवा ईमेलवर विश्वास ठेवू नका. कोणताही संशयास्पद व्यवहार तात्काळ ओळखण्यासाठी तुमच्या बँक खात्याचे स्टेटमेंट नियमितपणे तपासावे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade