राज्याचे पहीले Bio-Plastic धोरण जाहीर
राज्याचे पहीले Bio-Plastic धोरण जाहीर
मुंबई : राज्यातील प्लास्टिकचा वापर ३० टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने शुक्रवारी पहिले बायोप्लास्टिक धोरण जाहीर केले. ऊस, मका, साबुदाणा कंद, बटाटे आणि शेवाळ यांसारख्या नूतनीकरणक्षम जैविक स्रोतांपासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक बायोप्लास्टिक्स उद्योगांना प्रोत्साहन देणे हा या धोरणाचा मुख्य हेतू आहे. या नव्या उपक्रमातून राज्यात सुमारे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे तसेच १ लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट उद्योग विभागाने निश्चित केले आहे.
जागतिक स्तरावर युरोपीयन महासंघाने २०३० पर्यंत सर्व प्लास्टिक पॅकेजिंग पुनर्वापरयोग्य किंवा कंपोस्टेबल करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जर्मनी, इटली आणि जपानसारख्या देशांनी या क्षेत्रासाठी हरित खरेदी धोरणे व अनुदान सुरू केले आहेत. भारतातील बायोप्लास्टिक्स बाजारपेठ २०२३ पर्यंत ३.२९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असला तरी जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा केवळ ०.४६ टक्के आहे. त्यामुळे या क्षेत्रात विस्तारासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. महाराष्ट्र सरकारचे नियोजन म्हणजे राज्यातील प्लास्टिक कचरा कमी करणे, साखर उद्योगाला जोडधंद्याची संधी देणे आणि निवडक क्षेत्रांमध्ये किमान ३० टक्के सिंगल-यूज प्लास्टिकला बायोप्लास्टिक्सचा पर्याय उपलब्ध करून देणे. याशिवाय राज्यातून १ अब्ज डॉलर मूल्याच्या बायोप्लास्टिक्स निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. करार शेतीच्या माध्यमातून १ लाख शेतकऱ्यांना कच्चा माल पुरवठा साखळीत जोडून त्यांचे उत्पन्न वाढवण्याची योजना देखील आखण्यात आली आहे.
सवलतींची तरतूद
या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी सरकारने मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. ३१ डिसेंबरपूर्वी अधिकृत इरादा पत्र प्राप्त करून किमान ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या दोन मोठ्या उद्योगांना व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यापासून १० वर्षांच्या कालावधीसाठी स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या ३० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान दिले जाणार आहे. तसेच १० वर्षांसाठी दीर्घ मुदतीच्या कर्जावर वार्षिक ५ टक्के किंवा प्रतिवर्ष ५० कोटी रुपयांपर्यंत व्याज अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade