सोनम वांगचुक यांचे पतप्रधानांना पत्र, उपोषण सोडण्याची तयारी
सोनम वांगचुक यांचे पतप्रधानांना पत्र, उपोषण सोडण्याची तयारी
नवी दिल्ली-: येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान NEET पेपरफुटीप्रकरणात जबाबदारी स्वीकारत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी सोनम वांगचुक यांच्यासह कॉक्रोच जनता पक्षाच्या अभिजीत दीपके यांनी केली आहे. या मागणीसह सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर उपोषणाला बसले होते, मात्र न्यायालयाने त्यांच्या प्रकृतीला प्राधान्य देण्याचे निर्देश सरकारला दिल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने थेट रुग्णालयात दाखल केले. तरीही त्यांनी उपोषण सुरुच ठेवले आहे. आता, सरकारने त्यांच्यासोबत चर्चेला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांनी तीन अटींवर उपोषण सोडण्यास तयार असल्याचं पत्र केंद्र सरकारला लिहिलं आहे.
सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “सरकारने नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना पर्याप्त नुकसानभरपाई द्यावी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत संसदेत अर्थपूर्ण चर्चा व्हावी. तसेच, 20 जुलै रोजी झालेल्या ‘चलो संसद’ मार्चमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संयमाने शांततापूर्ण आंदोलन केले. पोलिसांकडून झालेल्या अतिरेकी कारवाई असूनही विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने आपली मागणी मांडली. या आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही तरुणांवर खटले किंवा दडपशाही न करता त्यांना संरक्षण द्यावे.”, अशी मागणी सोनम वांगचुक यांनी केली आहे.
वांगचुक यांच्या म्हणण्यानुसार, विविध राजकीय पक्षातील सुमारे 65 खासदारांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची शिक्षा किंवा खटला न भरल्याचे स्पष्ट आश्वासन दिले तरच ते उपोषण संपवतील, असे वांगचुक यांनी स्पष्ट केले आहे. अन्यथा उपोषण कायम ठेवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे, आता सरकार काय भूमिका घेते, सरकार त्यांच्या मागण्या मान्य करते का तेही लवकरच समजेल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade