वडाळा येथे रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
वडाळा येथे रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
मुंबई-आमदार कालिदास कोळंबकर यांच्या वतीने नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वडाळा जनसंपर्क कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. यामध्ये 555 पेक्षा जास्त बाटल्यामध्ये रक्त संकलित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन भाजपा वडाळा विधानसभा यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू आणि सन्मानचन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. युवकांनी आणि महिलांनी मोोठ्या सख्येने सहभाग घेतला होता.रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान हे ब्रीदवाक्य आपण नेहमी ऐकतो. परंतु आपण त्या ब्रीद वाक्य प्रमाणे कार्य करत नाही. रक्तदानातून सामाजिक चळवळ उभी राहून गरजू रुग्णाला रक्त मिळावे या सामाजिक भावनेतून आम्ही हे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आपल्या अमूल्य सहकार्य, समर्थन आणि योगदानामुळे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. आपल्या या सामाजिक बांधिलकीमुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवनाची आशा मिळेल अशी माहिती आमदार कालिदास कोळंबकर यांनी या ठिकाणी दिली. या शिबिराला भेट देण्यासाठी विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच अनेक सामाजिक संस्था आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant