‘AI’ धारावी दीदी’ देणार धारावीकरांच्या पुनर्विकासाच्या प्रश्नांना उत्तर
‘AI’ धारावी दीदी’ देणार धारावीकरांच्या पुनर्विकासाच्या प्रश्नांना उत्तर
मुंबई-: आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीला आता नवीन रूप मिळणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून त्याचा उद्देश धारावीतील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करून धारावीला आधुनिक, नियोजित आणि स्वयंपूर्ण वसाहतीत रूपांतरित करणे आहे. या प्रकल्पातून रहिवाशांना दर्जेदार घरे, सामाजिक सुविधा, आरोग्य व शिक्षणाची साधने उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. AI’धारावी दीदी’च्या मदतीने, पुनर्विकासाविषयी कोणतीही अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती धारावीकरांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे.’धारावी दीदी’ हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित डिजिटल सहकारी दररोज 24 तास स्थानिकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपलब्ध असेल.
व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल आणि व्हॉट्सअप करून, धारावीकरांना ‘धारावी दीदी’सोबत संवाद साधता येईल. सध्या ही सेवा हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असून, येत्या काही महिन्यांत त्यात तमिळ, तेलगू आणि गुजराती भाषेचा समावेश करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त भाषांचा समावेश करून ‘मिनी इंडिया’च्या बहुभाषिक संस्कृतींचा सन्मान या सेवेतून करण्यात येणार आहे.
“सर्वेक्षण, पात्रता, आवश्यक दस्तावेज किंवा पुनर्विकास प्रकल्पातील ताज्या घडामोडी यांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी ‘धारावी दीदी’ 24 तास उपलब्ध आहे.अतिशय सोप्या आणि स्पष्ट शब्दांत ती रहिवाशांसोबत संवाद साधेल. सध्या आमच्या वतीने धारावीत सुरू असलेल्या, माहिती, शिक्षण आणि संवाद (आयईसी) उपक्रमांमध्ये आता ‘धारावी दीदी’ची भर पडली आहे. यातून, प्रकल्पासबंधी अधिकृत आणि योग्य माहिती प्रत्येक धारावीकराला सहजनेते उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे” अशी प्रतिक्रिया एएनडीपीएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant