कर्नाटकात ASI ला सापडल्या रावणाच्या ३५ प्राचीन मूर्ती
कर्नाटकात ASI ला सापडल्या रावणाच्या ३५ प्राचीन मूर्ती
बंगळुरु-: भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (ASI) उत्खनन आणि संशोधनादरम्यान कर्नाटकातील मांड्या आणि म्हैसूर जिल्ह्यांमध्ये रावणाच्या 35 हून अधिक प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने रावणाच्या मूर्ती मिळणे हे स्पष्ट संकेत देते की, प्राचीन काळात येथील काही समुदायांमध्ये रावणाबाबत मोठी श्रद्धा होती. मांड्या येथील ‘मुथथी’ क्षेत्र पौराणिकदृष्ट्या भगवान राम, माता सीता आणि रामायण काळाशी जोडलेले आहे. दुसरीकडे जवळच असलेल्या पांडवपुरा आणि कुंती बेट्टाचा संबंध महाभारत काळातील पांडवांशी जोडलेला आहे. या शोधानंतर आता दक्षिण भारतातील प्राचीन काळातील सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासाची अनेक नवी पाने उलगडतील अशी आशा इतिहासप्रेमींनी व्यक्त केली आहे.
आता या सर्व मूर्तींचे अचूक वय आणि प्रत्यक्ष ऐतिहासिक संदर्भ शोधण्यासाठी त्यांचे सखोल वैज्ञानिक संशोधन, शिलालेख विश्लेषण आणि कार्बन डेटिंग केले जात आहे. या भागाचा लपलेला इतिहास पूर्णपणे समजून घेण्यासाठी अधिक उत्खनन आणि दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) करणे आवश्यक आहे, जेणेकरून जमिनीखाली अशा आणखी काही मूर्ती किंवा कलाकृती गाडल्या गेल्या आहेत का? हे समजू शकेल, असे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade