सॅटर्डे क्लबचा झाला दिमागदार सोहळा
सॅटर्डे क्लबचा झाला दिमागदार सोहळा
मुंबई-लोअर परळ येथील ‘द सेंट रेजिस’ येथे ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ (SCGT) – वडाळा चॅप्टरच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्याचा आणि उपस्थित उद्योजक बंधू-भगिनींशी संवाद साधण्याचा आनंद मिळाला. या सभागृहात मुंबईची प्रथम नागरिक म्हणून नव्हे, तर तुमच्यातील एक मुंबईकर म्हणून उपस्थित राहताना प्रत्येक मराठी उद्योजकाच्या डोळ्यांतील चमक आणि ऊर्जा खरोखरच कौतुकास्पद वाटली.असे रोजगार मुंबईच्या महापौर रितू ताई तावडे यांनी काढले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक, दूरदृष्टी लाभलेले आदरणीय माधवराव भिडे यांच्या कार्याचे प्रकर्षाने स्मरण झाले. भारतीय रेल्वेमधून ‘चीफ इंजिनीअर’ म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मराठी व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या संस्थेची पायाभरणी केली. “मराठी माणसाने श्रीमंत झाले पाहिजे” आणि “एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या विचारांवर आधारलेला हा उपक्रम आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताबाहेरही विस्तारला आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
या सोहळ्याला अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. अजित मराठे, सरचिटणीस श्री. सुहास फडणवीस, उपसरचिटणीस श्री. अंबादास खरात आणि वडाळा चॅप्टरचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. वडाळा चॅप्टरच्या सर्व नवनिर्वाचित टीमचे मनापासून अभिनंदन आणि आगामी व्यावसायिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देते असे तावडे म्हणाले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant