अमेरिकेत पुन्हा Public Charge नियम लागू, भारतीयांना चिंता
अमेरिकेत पुन्हा Public Charge नियम लागू, भारतीयांना चिंता
मुंबई- : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने ‘पब्लिक चार्ज’ या अत्यंत कडक आणि जुन्या नियमाची देशात पुन्हा अंमलबजावणी सुरू केली आहे. या नव्या बदलामुळे विशेषतः अमेरिकेत कार्यरत असलेल्या लाखो भारतीय आयटी व्यावसायिक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अमेरिका सरकार आता ग्रीन कार्ड देताना अर्जदारांची आर्थिक बाजू अतिशय बारीकपणे तपासणार आहे. सध्या अमेरिकेत रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी भारतीयांची फार मोठी प्रतीक्षा यादी आहे. एका ग्रीन कार्डसाठी भारतीयांना कित्येक वर्षे वाट पाहावी लागते. या प्रदीर्घ काळात पडताळणीचे नियम अधिक गुंतागुंतीचे आणि कडक झाले, तर मंजुरी मिळण्याच्या प्रक्रियेत आणखी अडथळे निर्माण होऊ शकतात
एखादा परदेशी नागरिक किंवा त्याचा परिवार खालील सरकारी योजनांचा थेट फायदा घेत असेल किंवा भविष्यात त्याला अशा मदतीची गरज पडू शकते असे वाटल्यास, अधिकारी त्याचा व्हिसा किंवा ग्रीन कार्ड रोखू शकतात.
आरोग्य विमा – सरकारकडून मिळणारी मोफत अथवा सवलतीची वैद्यकीय मदत.
फूड स्टॅम्प्स – खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी मिळणारे रेशन अनुदान.
थेट आर्थिक मदत – रोख स्वरूपात मिळणारे सरकारी भत्ते.
घरकुलाचा लाभ – राहण्यासाठी सरकारी निवासस्थाने किंवा भाड्यामध्ये मिळणारी सूट.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade