तुटलेल्या लाद्यांमुळे रेल्वे प्रवासी हैराण
तुटलेल्या लाद्यांमुळे रेल्वे प्रवासी हैराण
मुंबई-भायखळा रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे वरील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. परंतु सध्या रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात समस्यांच सामना सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना करावा लागत आहे.भायखळा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरील सीएसटीच्या दिशेकडील स्वयंचलित पूल चढताना लाद्या मोठ्या प्रमाणात तुटलेल्या अवस्तेत आहेत. या उखडलेल्या लाद्यामुळे रेल्वे प्रवासी पाय अडकून पडत आहेत. या बायकांना रेल्वे स्थानकावरून मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी ये – जा करत असतात. तसेच रेल्वेचे कर्मचारी देखील याच स्वयंचलित पादचारी पुलाचा वापर करतात. परंतु गेल्या काही दिवसापासून या पादचारी पुलावर चढताना लाद्या पूर्णपणे निसटल्या असून अनेक ठिकाणी तर लाद्यां उकडलेले असल्यामुळे खड्डे निर्माण झाले आहेत . त्यामुळे पादचाऱ्यांचा त्यात पाय अडकून पाडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तर या खड्ड्यामध्ये पाणी साचून ते चिखलाचे पाणी अंगावर उडून प्रवाशांचे कपडे खराब होण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. तसेच रात्रीच्या वेळेस अंधारामुळे ह्या स्थानकावरील खड्डे दिसत नसल्यामुळे पादचारी त्यात पाय अडकून पडत आहेत. त्यामुळे या स्थानकावरन पादचाऱ्यांना स्वयंचलित पुलावर चढणे फार कठीण झाले आहे. तरी या तुटलेल्या लाद्या त्वरित दुरुस्ती करण्यात याव्या अशी मागणी वेगळे प्रवासी करत आहेत.
भायखळा रेल्वे स्थानकावरील तुटलेल्या लाजू बाबत अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या असून त्याबाबत आम्ही संबंधित इंजिनियर विभागाला कळवले असून लवकरच या लाद्या दुरुस्ती करण्यात येतील अशी माहिती रेल्वे स्थानकाचे स्टेशन मॅनेजर गणेश स्वेन यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade