महाड पत्रकार संघाने केले विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
महाड पत्रकार संघाने केले विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
मुंबई-समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत महाड पत्रकार संघाच्या वतीने “एक हात मदतीचा” या उपक्रमांतर्गत महाड तालुक्यातील रा. जि. प. शाळा टेमघर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेशही देण्यात आला.
महाड पत्रकार संघ केवळ पत्रकारितेपुरता मर्यादित न राहता सामाजिक उत्तरदायित्व जपत विविध उपक्रम राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून “एक हात मदतीचा” या संकल्पनेतून रा. जि. प. शाळा टेमघर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा आणि त्यांना शिक्षणासाठी प्रेरित करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाला महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत, उपाध्यक्ष महेश शिंदे, सचिव रोहित पाटील, सहसचिव श्रीकांत सहस्त्रबुद्धे, कार्याध्यक्ष निलेश लोखंडे, खजिनदार राजेंद्र जैतपाल, गोपाळ कांबळे, नितेश लोखंडे, किशोर किर्वे, मिलिंद माने, तुकाराम साळुंखे, व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नियमित शिक्षण, वाचनाची सवय आणि उज्ज्वल भविष्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
शाळा प्रशासनाने महाड पत्रकार संघाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मोठे प्रोत्साहन मिळते, अशी भावना व्यक्त केली.
“एक हात मदतीचा” या उपक्रमातून समाजातील विविध घटकांनी शिक्षणासाठी पुढाकार घेतल्यास अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. महाड पत्रकार संघाचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत असून सर्व स्तरातून त्याचे स्वागत केले जात आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade