‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास
‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास
नवी दिल्ली-: केंद्र सरकारने यापूर्वी सर्व राज्यांना सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’चे गायन अनिवार्य करण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. आता त्यालाच कायदेशीर स्वरूप देण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे. सरकारने पावसाळी अधिवेशनासाठी तयार केलेल्या रणनीतीनुसार, सर्वप्रथम महत्त्वाचे अध्यादेश मंजूर केले जाणार असून ‘वंदे मातरम्’ विधेयक त्यात समाविष्ट आहे. याशिवाय आयकर दुरुस्ती विधेयक, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंबंधी विधेयक आणि इतर अनेक महत्त्वाची विधेयकेही मांडली जाणार आहेत.
दरम्यान, सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार, राष्ट्रगीत ‘जन गण मन’चे गायन रोखणे किंवा त्यावेळी जाणीवपूर्वक गोंधळ घालणे हा गुन्हा असून त्यासाठी तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आता प्रस्तावित दुरुस्ती मंजूर झाल्यास ‘वंदे मातरम्’चे गायन सुरू असताना त्याचा अपमान करणे किंवा त्यात अडथळा आणणे यालाही याच प्रकारची शिक्षा लागू होणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade