भोईवाड्यात १८ जुलै रोजी भव्य आरोग्य, नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर
मुंबई : वृक्षमित्र स्मृती प्रतिष्ठाण ट्रस्ट, जय जागेवाला गोविंदा पथक, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था, माऊली मेडिकल व वृक्षमित्र धन्वंतरी क्लिनिक तसेच ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत मोफत डोळे तपासणी शिबिर, अल्पदरात चष्मे वाटप, मोफत हेल्थ चेक-अप शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे ठिकाण भावसार समाज हॉल, स्वराज्य बिल्डिंग समोर, भोईवाडा, परळ, मुंबई–१२ असे आहे.
शिबिरात उंची, वजन, बीएमआय (बॉडी मास इंडेक्स), रक्तदाब, आरबीएस (रँडम ब्लड शुगर), ऑक्सिजन सॅच्युरेशन, डॉक्टरांचा सल्ला, ईसीजी (इलेक्ट्रोकार्डिओग्राम) तसेच पीएफटी (पल्मनरी फंक्शन टेस्ट) अशा विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. यासोबतच मोफत डोळे तपासणी करून अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रेटिना, तिरळेपणा आणि लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांवर मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच सर्व मेडिक्लेमधारकांसाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध राहणार आहे. रुग्णांच्या सोयीसाठी हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
भव्य रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. आरोग्य जनजागृती, रक्तदानाबाबत जागरूकता आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघाचे मुंबई शहर अध्यक्ष शिवम पवार यांचे मार्गदर्शन या शिबिराला लाभणार आहे.
विवेक वाखारे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी ९७६८३४५२९५ आणि ७७४३९२८५०४ या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी तसेच रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant