MPSC online परीक्षेचा निर्णय लांबणीवर
MPSC online परीक्षेचा निर्णय लांबणीवर
मुंबई: NEET पेपर फुटीमुळे निर्माण झालेल्या अव्यवस्थेमुळे सावध भूमिका घेत MPSC ने पूर्व परीक्षा Online घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या तीव्र निधेषांनंतर हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत होणाऱ्या बदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत, एमपीएससीची संगणकआधारित (ऑनलाईन) परीक्षा पद्धत लगेचच लागू न करता, ती ऑगस्ट २०२७ पासून अंमलात आणण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तोपर्यंत सर्व परीक्षा या सध्याच्या प्रचलित (ऑफलाईन) पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना नवीन परीक्षा पद्धतीसाठी सराव करायला आणि मानसिकरीत्या तयार व्हायला पुरेसा वेळ मिळणार आहे. तसेच, सरकारी यंत्रणांनाही आपली सज्जता वाढवता येईल. तोपर्यंत एमपीएससीच्या सर्व परीक्षा या विद्यमान प्रचलित पद्धतीनेच (सध्याच्या ऑफलाईन पद्धतीने) घ्याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा प्रक्रियेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “राज्यात एक सुरक्षित आणि पारदर्शी निवड प्रक्रिया असावी, हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पूर्णपणे पारदर्शीच असली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत झाल्या पाहिजेत आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेतच लागले पाहिजेत, यावर आपला भर आहे.”
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade