शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांच्या राजीनामा सत्रामुळे ISRO समोर मोठे संकट
शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांच्या राजीनामा सत्रामुळे ISRO समोर मोठे संकट
नवी दिल्ली-: जगात भारताचे नाव उंचावणारी, उत्तुंग कामगिरी करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था सध्या एका वेगळ्याच समस्येमुळे चर्चेत आली आहे. ISRO तील अनेक शास्त्रज्ञ आणि तांत्रिक विषयातील तज्ज्ञांनी राजीनाम्यांचा आणि ऐच्छिक निवृत्तीचे सत्रच सुरू केले आहे. अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत १०० ते १२० शास्त्रज्ञांनी इस्रोला रामराम ठोकला आहे. यातील ८० जण युआर राव सॅटेलाईट सेंटरचे कर्मचारी आहेत. तर विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या किमान २० शास्त्रज्ञांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील बरेच शास्त्रज्ञ भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान अंतराळ मोहिमेवर काम करत होते. यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे.
राजीनाम्यांची वाढती संख्या पाहता अंतराळ विभागानं १४ जुलैला एक नवा अंतर्गत आदेश काढला. त्यानुसार गगनयान आणि अन्य महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांशी संबंधित ‘ग्रुप ए’च्या शास्त्रज्ञांचे राजीनामे किंवा व्हिआरएस आता सामान्य प्रशासकीय प्रक्रिया समजले जाणार नाहीत. आता कोणत्याही सेंटरच्या संचालकांना त्यांच्या पातळीवर राजीनामा मंजूर करता येणार नाही. राजीनाम्याचा प्रत्येक अर्ज थेट अंतराळ विभागाकडे पाठवला जाईल आणि तिथेच अंतिम निर्णय होईल.
दरम्याम भारतात खासगी अंतराळ स्टार्टअप्सची संख्या वेगानं वाढत आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचा या ठिकाणी उत्तम संधी आणि चांगलं पॅकेज मिळत आहे. अंतराळ मोहिमांचा दबाव तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये मिशनचं अपयश यामुळे तणावग्रस्त स्थितीमुळे शास्त्रज्ञ इस्रो सोडत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade