मेट्रो ३ प्रकल्पबाधितांची नावे मतदारयादीत घेण्यास बीएलओचा नकार
मेट्रो ३ प्रकल्पबाधितांची नावे मतदारयादीत घेण्यास बीएलओचा नकार
मुंबई-मेट्रो ३ प्रकल्प बाधितांची नावे मतदार यादीत नोंद करण्यास बीएलओ अधिकाऱ्याने नकार दिल्याने गिरगावकरांची पंचाईत झाली आहे. याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्याविरोधात गिरगावकरांनी मेट्रो ३ रेल्वे प्रशासनाकडे दाद मागितली आहे.
मतदारयादी दुरुस्तीचे काम मुंबईभर सुरू झाले आहे. त्यासाठी बीएलओ म्हणजेच बूथ लेवल अधिकारी घरोघरी नागरिकांना भेटून माहिती घेऊन बोगस मतदार वगळून नवीन मतदार समाविष्ट करत आहेत. या कामासाठी गिरगावात हरीश राठोड नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. पण सदर अधिकाऱ्याने स्थानिकांना नवीन मतदारयादीत नावनोंदणी करणार नाही, असे उद्धटपणे सांगितल्याने नवा वाद उद्भवला आहे. वरिष्ठांनी
सांगितल्यामुळे मी नाव नोंद करत आहे, असे राठोड यांनी म्हटले आहे.
गिरगावातील ४५० हून जास्त रहिवाश्यांनी मेट्रो ३ प्रकल्पासाठी जागा जमिनी, घरांवर पाणी सोडले आहे. काही प्रकल्पबाधितांना घरभाडे तर काहीना म्हाडाच्या तापुरत्या सदनिका देण्यात आलेल्या आहेत. आजही ही सर्व मंडळी गुण्यागोविंदाने गिरगावात राहत आहेत. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुकांत मेट्रो बाधितांनी मतदान करून आपला हक्क बजावला आहे. ते पिढ्यानपिढ्या गिरगावात राहत आहेत. मूळ गिरगावकरांनाच निवडणूक निर्णय अधिकारी तुमचे नाव मतदार यादीत नोंदवणार नाही असे ठामपणे सांगत आहेत. आमच्या वरिष्ठांनी असे सांगितल्याचे राठोड नागरिकांना छाती ठोकून सांगत आहेत. तुम्ही वरिष्ठांना विचारा, असे उर्मटपणे बोलत आहे.
आम्ही वर्षानुवर्षे गिरगावात राहत असून आम्ही लोकसभेला, विधानसभेला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील मतदान केले होते. परंतु आता आम्हाला तुमचे नाव मतदान यादीत टाकता येणार नाही त्यासाठी तुम्ही सरळ वरिष्ठांना जाब विचारा असे बी एला ओ हरीश राठोड कडून सांगण्यात येत असल्याची माहिती स्थानिक रहिवासी दीपक सांगळे यांनी दिली.
आमचे नाव मतदान यादीत न घेणे हा फार मोठा गुन्हा असून आम्हाला मतदान करण्यापासून वंचित ठेवण्याचा हा एक प्रकार आहे. आम्ही स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे देखील यांबाबत तक्रार केली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मलबार हिल विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी देखील या लोकांची समस्या जाणून घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच आम्ही मेट्रो प्रशासनाकडे तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार केली असून लवकरच यावर निर्णय येईल अशी माहिती स्थानिक रहिवाशी सुनीता राणे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant