शिक्षक समन्वय संघाचे आझाद मैदानातील आंदोलन स्थगित
शिक्षक समन्वय संघाचे आझाद मैदानातील आंदोलन स्थगित
मुंबई - राज्यातील खाजगी अंशत: अनुदानित शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना एक एप्रिल २०२७ पासून अनुदानाचा वाढीव टप्पा देऊ,असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी सायंकाळी आझाद मैदानात दिली.मंत्री भुसे यांच्याबरोबर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
वाढीव टप्पा व इतर मागण्यांसाठी २२ जून २०२६ पासून शिक्षक समन्वय संघाने आंदोलन सुरु केले होते.भुसे यांच्या आश्वासननानंतर समन्वय संघाने आंदोलन स्थगित केले.अनुदान वाढीव टप्प्याचा लाभ सुमारे ६० हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांना मिळेल,असे समन्वय संघाकडून सांगण्यात आले.
वीस टक्के,चाळीस टक्के व ६० व ८० टक्के अनुदान घेत असलेल्या राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना सरसकट शब्द वगळून यापुढील वाढीव टप्पे संच मान्यतेनुसार एक जून २०२६ पासून मिळावेत,त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना २५ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार समान टप्प्यावर अनुदान आदेश व्हावा आदी मागण्या समन्वय संघाच्या होत्या.यासाठी संघाने आंदोलन सुरु केले.गेले दोन दिवस आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.त्याचबरोबर आंदोलकांची संख्या वाढली होती.याची दखल राज्यसरकारला घ्यावी लागली.शुक्रवारी सायंकाळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे पावसाळी अधिवेशन सोडून आंदोलनस्थळी आले.
यावेळी दादा भुसे यांनी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.अनुदानाचा वाढीव टप्पा देऊ,पण; तो एक एप्रिल २०२७ पासून दिला जाईल.तसेच शंभर टक्के अनुदान देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,असे आश्वासन दिले.यानंतर मंत्री गिरीष महाजन म्हणाले,सध्या महाराष्ट्रात पूर परिस्थिती झाली आहे.शेतकर्यांना आर्थिक मदत करायची आहे. सध्या राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे.शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळेल.पण;त्यासाठी सहा ते सात महिने वाढ बघावी लागेल.पुढील वर्षी मार्चमध्ये तुम्हाला आंदोलन करावे लागणार नाही.या दोन्ही मंत्र्यांच्या आश्वसनानंतर समन्वय संघाने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade