भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात भव्य संयुक्त अभिवादन सोहळा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात भव्य संयुक्त अभिवादन सोहळा
पुणे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती समिती’च्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी १० वाजता भव्य ‘संयुक्त अभिवादन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत महामानवाला अभिवादन केले.
या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार चेतन तुपे आणि माजी आमदार मोहन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, गणेश बिडकर, नगरसेवक निलेश आल्हाट, ज्येष्ठ नेते बाळासाहेब जानराव, रिपाई शहराध्यक्ष संजय सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, महिपाल वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत कुंडलवार आणि समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासह विविध शासकीय अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात बँड पथकाच्या मानवंदनेने झाली. त्यानंतर बौद्ध भिक्षूंच्या उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदना व भीमस्तुती सादर करण्यात आली. शेवटी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात .
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या सोहळ्यासाठी राहुल नागटिळक, विठ्ठल गायकवाड आणि समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant