जगातील पहिले वन्यजीव पशुवैद्यक विद्यापीठ भारतात
जगातील पहिले वन्यजीव पशुवैद्यक विद्यापीठ भारतात
जामनगर - रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी जागतिक वन्यजीव संरक्षण संस्था, ‘वनतारा’ ने जामनगरमध्ये ‘वनतारा युनिव्हर्सिटी’ सुरू करण्याची घोषणा केली. अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली हे विद्यापीठ भारताला जागतिक शिक्षण आणि संवर्धन केंद्र बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे विद्यापीठ वन्यजीव संवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी समर्पित असलेले जगातील पहिले एकात्मिक जागतिक विद्यापीठ ठरणार आहे.
वनतारा विद्यापीठाची पायाभरणी प्राणी कल्याण, वैज्ञानिक प्रगती आणि वन्यजीव संवर्धनाच्या भविष्यातील गरजांवर आधारित आहे. या संस्थेचा उद्देश पशुवैद्यकीय शास्त्र, संवर्धन आणि वन्यजीव काळजी क्षेत्रात भविष्यातील नेतृत्व घडवणे हा आहे.
ही युनिव्हर्सिटी वन्यजीव औषध व शस्त्रक्रिया, प्राणी पोषण आणि वर्तन शास्त्र, जेनेटिक्स, एपिडेमियोलॉजी आणि ‘वन हेल्थ’, संवर्धन धोरण यासारख्या विषयांवर यूजी, पीजी, फेलोशिप व विशेष उपक्रम चालवेल. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाईल. प्रगत क्लिनिकल पायाभूत सुविधा व आंतरराष्ट्रीय सहकार्यासह, हा निवासी परिसर शोध-आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करेल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade