Netflix ने खास लहान मुलांसाठी लाँच केले गेमिंग ॲप
Netflix ने खास लहान मुलांसाठी लाँच केले गेमिंग ॲप
मुंबई-नेटफ्लिक्सने 8 वर्षांखालील मुलांसाठी Netflix Playground’ नावाचे एक खास गेमिंग ॲप लाँच केले आहे. या ॲप-मधील वापरकर्त्यांना खरेदी किंवा अतिरिक्त शुल्काचा कोणतेही पैसे भरावे लागणार नाही, मुलांसाठी हे एक सुरक्षित आणि मनोरंजक व्यासपीठ असून पूर्णपणे सुरक्षित आणि जाहिरातमुक्त असल्याचा दावा NetFlix ने केला आहे.
हे ॲप तुमच्या सध्याच्या नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसोबत काम करते, म्हणजेच वेगळे काहीही खरेदी करण्याची आवश्यकता नाही. कंपनीच्या मते हे ॲप मुलांची सर्जनशीलता आणि शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी तयार केले आहे. तसेच ॲप त्यांच्या आवडत्या पात्रांसोबत एक मजेदार आणि सुरक्षित गेमिंग अनुभव देते, ज्यामुळे स्क्रीन टाइम उपयोगी बनतो. असे कंपनीचे म्हणणे आहे.
ॲपमध्ये मुलांसाठी अनेक प्रकारच्या सोप्या आणि इंटरॅक्टिव्ह गेम दिले आहेत. जे त्यांच्या आवडत्या कॅरटून शोच्या आवडत्या कॅरेक्टरवर आधारित करून दिले आहेत. यामध्ये Peppa Pig, Sesame Street आणि Dr. Seuss यांच्यासारख्या आधारित गोष्टींवर गेम या ॲपमध्ये देण्यात आले आहेत. खेळांमध्ये पजल्स, मेमरी गेम्स, रंग भरण्याची पाने आणि इतर क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीचा समावेश आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व गेम बिना इंटरनेट कनेक्शनशिवाय खेळता येतात.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर