वऱ्हाडींच्या वाहनाचा भीषण अपघात; 4 ठार, 12 जखमी…
वऱ्हाडींच्या वाहनाचा भीषण अपघात; 4 ठार, 12 जखमी…
धुळे – साक्री तालुक्यातील तामसवाडी येथे लग्नकार्य पूर्ण करून आपल्या घरी धुळे तालुक्यातील शिरडाणे येथे जाणाऱ्या वऱ्हाडींच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली असून या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून 12 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास क्रुझर (एमएच 18/ डब्ल्यू 6226) हे वाहन वऱ्हाडींना घेवून शिरडाणेहून तामसवाडीच्या दिशेने निघाले होते. तामसवाडीला लग्नकार्य आवरून सर्व वऱ्हाडी घराकडे निघाले असता त्यांच्या वाहनाला अक्कलपाडाजवळ हा भीषण अपघात झाला.
समोरून हेलकावे खात येणाऱ्या एका वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रुझर गाडी उलटली. यात 3 जण जागीच ठार तर 1 जण उपचारादरम्यान दगावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर या भीषण अपघातात 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर 108 रुग्णवाहिका तातडीने मदतीसाठी पोहचली, शिवाय सिव्हील सर्जन डॉ. रविंद्र सोनवणे हे देखील मदत कार्यासाठी धावून गेले. जखमींना उपचारार्थ साक्री रुग्णालय तसेच धुळे येथील हिरे रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेमुळे तामसवाडी आणि शिरडाणे गावात शोककळा पसरली आहे. उशिरापर्यंत पोलिसांकडून अपघाताची नोंद घेतली जात होती.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade