सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच
सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच
Gold : सोने-चांदीच्या दरात घसरण सुरूच...सोने 3 हजार 800 रुपयांनी स्वस्त..-सोने प्रतितोळा 1 लाख 48 हजारांपर्यत खाली..-चांदीच्या दरातही तब्बल 7 हजारांची घट...चांदीचे दर 2 लाख 37 हजार 930 रुपयांवर..-युद्धाची तीव्रता कायम राहिल्यास दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
सोने आणि चांदीच्या दरात घसरणीचा कल थांबत नाहीये. यामुळे आधीच गुंतवणूक करून बसलेल्या लोकांचे टेन्शन वाढले आहे तर दुसरीकडे, सर्वसामान्य ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद खिळले आहे. पश्चिम आशियात इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यामधील तणाव वाढत असतानाही सोन्या-चांदीच्या किमतींमधील घसरणीमुळे गुंतवणूकदार आश्चर्यचकित झाले आहेत.
पश्चिम आशियातील युद्ध चौथ्या आठवड्यात पोहोचले आहे आणि अमेरिका व इराण यांच्यात नव्या हल्ल्यांच्या धमक्यांनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आणि गेल्या वर्षभरातील वाढ पुसून निघण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे.
या दरम्यान, सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, जागतिक स्तरावर सोन्या-चांदीच्या दरातील नरमाई, तसेच अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे महागाई आणि जागतिक व्याजदरांमध्ये वाढ होण्याची भीती निर्माण झाल्यामुळे सोमवारी भारतात सोन्या-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात घट नोंदवली गेली.
MCX वरील सोन्याचे दर मागील बंद पातळी1,44,492 च्या तुलनेत 3% घसरून 1,40,158 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडले. तर काही मिनिटांत आणखी 7,115 रुपये किंवा 4.92% इतकी घसरण होऊन दरांनी 1,37,377 रुपयांची नीचांकी गाठली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमती 10% हून अधिक कोसळल्या. तसेच एमसीएक्सवर चांदीच्या दरात 6% किंवा 13,606 रुपयांची घट होऊन दर प्रति किलो 2,13,166 रुपयांवर पोहोचले. देशांतर्गत बाजारात मार्च महिन्यात आतापर्यंत सोने आणि चांदीच्या किमती 12% ते 17% घसरल्या आहेत.
त्याचवेळी, सोन्याच्या किमती 2 टक्क्यांहून अधिक घसरल्या असून यामुळे पिवळ्याधमक सोन्याची घसरण सुमारे चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. स्पॉट चांदीच्या किमती 3.2% कोसळून 65.61 डॉलर्स प्रति औंसवर आल्या आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant