‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन
‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन
महिला
मुंबई प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ च्या निमित्ताने ‘हॉवर्थ इंडिया’ने ‘गिव्ह टू गेन’ या संकल्पनेवर आधारित आर्किटेक्चर आणि डिझाइन क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेट संस्था आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीजमधील वरिष्ठ महिला नेत्यांना एकत्र आणत विशेष नेतृत्त्व चर्चासत्र मालिकेचे आयोजन केले होते. या मालिकेतील दोन सत्रे दादर, मुंबई येथे पार पडली असून पुढील कार्यक्रम बेंगळुरू आणि हैदराबाद येथे होणार आहेत . वरिष्ठ आर्किटेक्ट्स, डिझाइनमधील आघाडीचे अधिकारी आणि या क्षेत्रातील विविध भागधारकांच्या सहभागासह आयोजित या सत्रात पॅनेल चर्चेनंतर श्रोत्यांशी संवाद साधण्यात आला आणि त्याचा मुख्य भर महिलांच्या नेतृत्वाचा व्यवसायावर होणारा परिणाम यावर होता.
कार्यालयांचे सुयोग्य आणि विचारपूर्वक रचना केली, मार्गदर्शन दिले गेले आणि सहकार्य राखले तर पुन्हा कामावर येण्यासाठी मदत केली तर महिलांना सक्षम करता येते यावर चार शहरांमधील मालिकेचा भर आहे. तसेच समावेशकतेकडे केवळ सामाजिक उपक्रम म्हणून नव्हे तर संस्थात्मक कामगिरी वाढविणारा महत्त्वाचा घटक म्हणून पाहण्यावर या चर्चासत्रात भर देण्यात आला.
मुंबई आणि दिल्ली येथील कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील वरिष्ठ महिला नेत्यांनी सहभाग घेतला. सुमारे ५५ मिनिटांची पॅनेल चर्चा झाल्यानंतर उपस्थित माध्यम प्रतिनिधी आणि निमंत्रित पाहुण्यांशी खुला संवादही झाला.
या उपक्रमाविषयी बोलताना ‘हॉवर्थ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक मनीष खंडेलवाल म्हणाले, “महिला जाणीवपूर्वक नेतृत्व करतात तेव्हा प्रगतीचा वेग वाढतो. ‘गिव्ह टू गेन’ उपक्रमाद्वारे हॉवर्थने विविध उद्योग क्षेत्रांतील दृष्टीकोन एकत्र आणत समावेशक नेतृत्व आणि कार्यालयीन रचना केवळ सामाजिक उद्देशापुरते मर्यादित न राहता संस्थांच्या कार्यक्षमतेला चालना देणारे घटक कसे ठरू शकतात यावर चर्चा घडवून आणली. मार्गदर्शन, सहकार्य आणि पुन्हा कामाची ओढ लागण्यासाठी करावयाच्या गोष्टी यांसारख्या विषयांवरील संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे महिलांना त्यांच्या व्यावसायिक प्रवासाच्या विविध टप्प्यांवर अर्थपूर्ण योगदान देता येईल अशी कार्यालये निर्माण होण्यास मदत होते.”
चर्चेची सुरुवात वैयक्तिक प्रगती आणि महत्त्वाच्या टप्प्यांवरील अनुभवांपासून झाली आणि त्यात वक्त्यांनी त्यांच्या प्रारंभीच्या प्रेरणा, करिअरमधील महत्त्वाचे वळणबिंदू आणि नेतृत्त्वशैलीला आकार देणारी व्यावसायिक आव्हाने याविषयी सांगितले. यानंतर मार्गदर्शन, सहकार्य, व्यावसायिक नेटवर्क आणि पुन्हा कामावर येण्यासाठी ओढ लागावी म्हणून आयोजित केलेले उपक्रम व ज्ञानाचे आदानप्रदान यांसारख्या संरचित प्रणाली नेतृत्वक्षमता व व्यवसायिक कामगिरी कशा बळकट करता येतात यावर भर देण्यात आला.
तिसऱ्या टप्प्यात महिलांना वाढीसाठी मदत करणारी कार्यस्थळे यावर चर्चा करताना समावेशक धोरणे, नेतृत्व संस्कृती आणि सहाय्यकारी कार्यालय उपाययोजना या घटकांमुळे सर्जनशीलता, विश्वास, नवोन्मेष आणि सातत्यपूर्ण सहभाग कसा वाढतो यावर चर्चेत सहभागी मान्यवरांनी विचार मांडले. अंतिम टप्प्यात कार्यस्थळे महिलांना सक्रियपणे कशी मदत करू शकतात यावर चर्चा झाली.
‘हॉवर्थ इंडिया’च्या पवई येथील शोरूममध्ये आयोजित पॅनेलमध्ये कुशमन अँड वेकफिल्ड इंडियाच्या वरिष्ठ संचालक आणि डिझाइन प्रमुख झैनब मुकादम, बिलबोर्ड इंडियाच्या मुख्य संपादक वाजपेयी आणि डब्ल्यूपीपीमधील रिअल इस्टेट आणि वर्कप्लेस सर्व्हिसेस प्रमुख कल्पना शंकर यांनी सहभाग घेतला.
चर्चेसंदर्भात बोलताना झैनाब मुकादम म्हणाल्या, “कार्यालयीन डिझाईन हे सर्जनशीलता आणि नेतृत्व यांच्या संगमावर उभे असते, कारण त्यातून संस्थांमधील लोकांना कामाचा अनुभव कसा मिळतो यावर डिझाइनर प्रभाव टाकू शकतात.”
“माझ्या प्रवासात सातत्य आणि प्रत्येक वेळी पुढे येण्याचे धैर्य हे अत्यंत महत्त्वाचे ठरले. घरातील समानतेच्या मूल्यांनी माझ्या जीवनाकडे आणि नेतृत्वाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाला आकार दिला. प्रगती तेव्हाच शक्य असते जेव्हा पुढे जाणाऱ्या महिला इतरांनाही हाताला धरून पुढे नेत असतात अशी माहिती कल्पना शंकर यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant